Mahesh Tile

मी महेश टिळे, विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरी कर्मधर्मसंयोगाने कला-अध्यापक आहे. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये कलाशिक्षक (Art Teacher), Animator, Programmer, Web-Developer इत्यादी क्षेत्राचा अनुभव घेऊन, आता तंत्रज्ञानासोबत पर्यटन आणि भारतीय संस्कृती या विषयामध्ये मी अभ्यास करीत आहे.

पर्यटनाचा अभ्यास करताना प्रामुख्याने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वाधिक परदेशी पर्यटकं येत असतात. असे असूनही महाराष्ट्रातील काही जागतिक वारसा स्थळे वगळता इतरत्र हे परदेशी पर्यटक जात नाहीत आणि त्यास कारण म्हणजे महाराष्ट्रात पर्यटनाबद्दल असलेली उदासीनता. मराठी मधील अपुऱ्या माहितीमुळे लोकांमधील असलेला जागरूकतेचा अभाव. पर्यटकांसाठी असलेल्या योजना व नियमांचे अज्ञान. यासारख्या इतर अनेक गोष्टींमुळे  महाराष्ट्रातील अंतर्गत भागात देशी व परदेशी पर्यटक कमी प्रमाणात येतात. भारत व महाराष्ट्र राज्य सरकारच्या पर्यटन वाढीच्या उद्दिष्टाला व मला ज्ञात होणाऱ्या पर्यटन विषयाची माहिती सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी या ब्लॉगची निर्मिती झाली आहे.

‘पर्यटन विश्व’ या नावाने या ब्लॉगची सुरुवात करताना ‘पर्यटनासंबधीच्या सर्व गोष्टी’ हाच अर्थ येथे अभिप्रेत आहे. त्यामुळे पर्यटनातील अथ पासून इति पर्यंतच्या सर्वच गोष्टीवर लिखाण करण्याच्या माझा मानस आहे. त्यासाठी तुम्हा वाचकांचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे.

पर्यटन विश्वमध्ये वापरले जाणारे छायाचित्रे ही CC Zero ह्या परवानगी अंतर्गत वापरले आहेत किंवा लेखकाच्या मालकी हक्काचे आहेत. पर्यटन विश्ववरील लेखांत माझी मते, अभ्यास मांडलेला असतो. त्यामुळे पर्यटन विश्व आणि त्यावरील लेख, छायाचित्रे, तसेच इतर साहित्य यांविषयीचे सर्व हक्क माझ्याकडे अर्थात संकेतस्थळ धारकाकडे राखिव असून कोणत्याही व्यक्तीला पर्यटन विश्व या संकेतस्थळावरील गोष्टींचा परवानगीशिवाय वापर करता येणार नाही.

परवानगीसाठी, नवीन संकल्पनांसाठी किंवा तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर आपण maheshtile {at} gmail {dot} com या ईमेलद्वारा संपर्क करून आपले विचार माझ्यापर्येंत पोहचवू शकता.

धन्यवाद.