
तीन वर्षांत एकूण 50 कोटी वृक्ष लागवड करून राज्याचा 33% भूभाग वृक्षाच्छादित करणे हे हरितसेनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. फक्त वृक्ष लावणे हे उद्दिष्ट न ठेवता वृक्ष लावण्याच्या मानसिकतेचे बीजारोपण करणे हा प्रमुख हेतू असल्याचे दिसून येते.
वृक्ष हे मानवासाठी अत्यंत उपयुक्त असूनही मानवाने अनेक वर्षांपासून वृक्षांची अपरिमित तोड केली. यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडले. पर्जन्यमानावर परिणाम झाला. प्रदूषण वाढले. मानवाच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला. अशा संकटांना मानवाने आपल्या अविचाराने दारात आणून सोडले आहे. त्यामुळे वेळीच या जंगलांच महत्त्व ओळखून, या संकटाची तीव्रता कमी व्हावी यासाठी महाराष्ट्र वनविभागाने महावृक्षारोपणाचा प्रकल्प हाती घेतला.
दरवर्षी भारतात, राष्ट्रीय पर्यटन दिन – हा 25 जानेवारीला साजरा केला जातो. भारतीय वार्षिक सकल उत्पन्न (GDP) वृद्धीसाठी पर्यटनाचे असलेले महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी हा राष्ट्रीय पर्यटन दिन/दिवस साजरा केला जातो. 1980 च्या दशकापासून आधुनिक भारतीय पर्यटनास खरी सुरुवात झाली Read More …